शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजना 20वा हप्ता ₹2000 बँक खात्यात जमा, येथे चेक करा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजना 20वा हप्ता ₹2000 बँक खात्यात जमा, येथे चेक करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर होते, सकाळी 11 वाजता एका विशेष कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मोबाईलवर मेसेज तपासा!

हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मेसेज येणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलवर मेसेजची नोटीफिकेशन पाहा. देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे.

कोण पात्र आहेत?

  • केवळ योजनेच्या लाभार्थी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता
  • नाव यादीत आहे की नाही, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.
    👉 वेबसाईट: pmkisan.gov.in
    👉 ‘Farmer Corner’ मध्ये जाऊन ‘Beneficiary List’ तपासा.
    👉 आधार नंबर किंवा खाते नंबर टाका आणि “Get Data” वर क्लिक करा.

ई-केवायसी आवश्यक आहे!

जर ई-केवायसी पूर्ण झाली असेल आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे खात्यात येतील. ई-केवायसीसाठी PM Kisan मोबाइल अ‍ॅपवर फेस ऑथेंटिकेशनची सुविधा दिली आहे, ज्यामुळे फिंगरप्रिंट किंवा OTPची गरज नाही.

समस्या असल्यास कुठे संपर्क कराल?

कोणतीही अडचण असल्यास खालील हेल्पलाईनवर संपर्क करा:
📞 1800-115-5525 / 155261 / 011-24300606

कोणाला लाभ मिळणार नाही?

  • ज्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय सरकारी नोकरीत आहेत किंवा निवृत्त झाले आहेत
  • ज्यांना दरमहा 10,000 रुपयांहून अधिक पेन्शन मिळते
  • जे आयकर भरतात

अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.


Leave a Comment