PM Kisan Samman nidhi yojana : 2000 रुपये खात्यात येणार, एका क्लिकवर तपासा बॅलेन्स
PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै 2025 रोजी बिहारच्या मोतिहारी येथे आयोजित सभेत 20 व्या हप्त्याचा अधिकृत शुभारंभ करू शकतात. यावेळी ते 7,200 कोटी रुपये किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी देखील करणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
देशातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधीचा, म्हणजेच 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. सरकारने यापूर्वी 2024 मध्ये जून महिन्यात हप्ता दिला होता. मात्र, यावेळी काहीसा उशीर झाला असून, 18 जुलैपासून 2,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.
पीएम किसान योजनेत लाभ मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता आवश्यक आहे. सर्वप्रथम, बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. त्यानंतर, पीएम किसान पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या पोर्टलवरील ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करून आपले स्टेटस आणि आधार लिंकिंग तपासता येते.
आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- PM Kisan Website उघडा
- ‘Payment Success’ टॅबखाली भारताचा नकाशा दिसेल
- डावीकडील यलो ‘Dashboard’ टॅबवर क्लिक करा
- ‘Grama Dashboard’ मध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा
- ‘Get Report’ बटणावर क्लिक करा
- यादीत आपले नाव आहे की नाही ते तपासा
जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केलेली नसेल तर लगेच खालीलप्रमाणे प्रक्रिया करा:
- पीएम किसान पोर्टलवर जा आणि ‘Farmers Corner’ मध्ये ‘नवीन नोंदणी’ निवडा
- आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा, OTP मिळवा आणि पुढील स्टेप्स पूर्ण करा
- ‘शेतजमिनीचा पुरावा’ (जसे की 7/12 उतारा किंवा खसरा) अपलोड करा
- आवश्यक बदल करून नोंदणी सबमिट करा
जर हप्त्याच्या वितरणात अडचण येत असेल, तर जवळच्या CSC केंद्राशी किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करा.