जुलै वार्षिक वेतनवाढ : मुळ वेतनात किती वाढ होणार – जाणून घ्या 7th पे नुसार सविस्तर पे – लेव्हल निहाय चार्ट
राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व नियमित कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ (Annual Increment) दिली जाते. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिली जाते. वेतनवाढ ही कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनाच्या (Basic Pay) 3% इतकी असते आणि ती सर्वात जवळच्या शंभर रुपयांच्या रकमेपर्यंत (Nearest Hundred Rupees) गोल केली जाते.
इथे पहा सविस्तर तक्ता
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मुळ वेतन ₹25,500 असेल, तर त्यावर 3% म्हणजे ₹765 वाढ होईल. ही रक्कम ₹800 पर्यंत गोल केली जाईल आणि त्यामुळे नव्या वेतनरचनेनुसार त्या कर्मचाऱ्याचे मुळ वेतन जुलैपासून ₹26,300 असेल.
येथे तक्ता डाउनलोड करा
ही वेतनवाढ कर्मचारी ज्या पे लेव्हलमध्ये (Pay Level) आहेत त्यानुसार ठरते. काही पे लेव्हलमध्ये ही वाढ किमान ₹500 तर काही उच्चस्तरीय पे लेव्हलमध्ये कमाल ₹5500 पर्यंत असते.
वार्षिक वेतनवाढीचा लाभ वेतनश्रेणी, सेवा कालावधी व पदावर अवलंबून असून, खालील चार्टमध्ये प्रत्येक पे लेव्हलनुसार वाढीची माहिती देण्यात आली आहे. आपले सध्याचे मुळ वेतन पाहून, तुम्हाला जुलै 2025 मध्ये किती वाढ मिळेल, याचा अंदाज घेता येईल.