गुगल पे देणार १ लाख रु. पर्सनल लोन; असा करा अर्ज

गुगल पे देणार १ लाख रु. पर्सनल लोन; असा करा अर्ज

रक्कम थेट पाच मिनिटात तुमच्या बँक खात्यामध्ये मोबाईल द्वारे अर्ज करा

गुगल पे’ची धमाकेदार; एका क्लिकवर मिळवा 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज

अचानक पैशांची गरज भासली, तर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) ही एक उत्तम सोय ठरते. आता गुगल पे (Google Pay) वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डीएमआय फायनान्स (DMI Finance) आणि गुगल पे यांच्या भागीदारीतून फक्त एका क्लिकवर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

एका मिनिटात मिळवा कर्ज

जर तुम्ही गुगल पेचा वापर करत असाल आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल, तर तुम्ही या सुविधेसाठी पात्र ठरू शकता. डीएमआय फायनान्सच्या पूर्वनिर्धारित निकषांनुसार निवडलेले युजर्स कर्जासाठी प्री-अप्रूव्ह्ड (Pre-approved) ठरतात. अशा युजर्सना फक्त एका क्लिकवर झटपट कर्ज मिळू शकते. हे कर्ज जास्तीत जास्त 36 महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांच्या कालावधीत परत करता येईल.

गुगल पे वापरकर्त्यांना मिळणार दुहेरी फायदा

गुगल पेचा वापर करणाऱ्या युजर्सना यामध्ये दुहेरी फायदा मिळणार आहे. एक म्हणजे गुगल पेच्या सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख सेवेचा लाभ, आणि दुसरं म्हणजे डीएमआय फायनान्सकडून मिळणारं तात्काळ वैयक्तिक कर्ज. ही सुविधा 15 हजारहून अधिक पिनकोड क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे.

कोणाला मिळेल कर्जाचा लाभ?

सर्व गुगल पे युजर्सना हे कर्ज मिळणार नाही. ही सुविधा फक्त त्यांनाच मिळणार आहे, ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे आणि जे डीएमआय फायनान्सच्या अटींनुसार पात्र ठरतात. जर तुम्ही प्री-अप्रूव्ह्ड ग्राहक असाल, तर तुमचं कर्ज अर्ज रिअल टाइममध्ये प्रक्रिया होऊन थेट तुमच्या बँक खात्यात जमा केलं जाईल.

अशा प्रकारे घ्या कर्जाचा लाभ

  1. गुगल पे अ‍ॅप उघडा.
  2. जर तुम्ही पात्र असाल, तर “Loan Offer” चा पर्याय तुम्हाला प्रमोशनल बॅनरमध्ये दिसेल.
  3. त्या ऑफरवर क्लिक केल्यानंतर “Personal Loan” हा पर्याय निवडा.
  4. यामध्ये डीएमआय फायनान्सचा पर्याय दिसेल.
  5. येथे तुम्हाला किमान व कमाल किती कर्ज मिळू शकते याची माहिती दिली जाईल.
  6. इतर अटी व तपशीलही पाहता येतील.
  7. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, कर्ज मंजूर झाल्यास रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

जर तुम्हाला अचानक पैशांची गरज असेल आणि तुम्ही गुगल पे वापरत असाल, तर डीएमआय फायनान्सच्या या सुविधेचा जरूर विचार करा. ही सेवा सुरक्षित, जलद आणि सोपी असून घरबसल्या एका क्लिकवर कर्ज मिळवण्याची उत्तम संधी आहे.

सूचना / Disclaimer:

वरील माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. कर्ज सुविधा डीएमआय फायनान्स लिमिटेड (DMI Finance Ltd.) व गुगल पे यांच्यातील भागीदारीअंतर्गत दिली जाते. कर्ज मंजुरीसाठी कंपनीचे स्वतःचे नियम, अटी व पात्रता निकष लागू होतात. गुगल पे वापरणाऱ्या सर्वांना कर्ज मिळेलच असे नाही. वाचकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधून खात्री करावी. या माहितीत कोणताही बदल झाल्यास त्याची जबाबदारी आमची राहणार नाही.

Leave a Comment