राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 55% DA वाढीचा निर्णय 31 जुलै अखेर!
राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक 55% महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची वाट पाहत आहेत. यासंदर्भात निर्णय नेमका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै रोजी संपले, मात्र या अधिवेशनात DA वाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
दरम्यान, केंद्र सरकारने जुलै 2025 मधील DA वाढीवर विचार सुरू केला असतानाच, महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या DA वाढीबाबत निर्णय घेतलेला नाही.
31 जुलैपर्यंत निर्णय होण्याची शक्यता
मिडियामधून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार 31 जुलै 2025 पर्यंत DA वाढीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2% वाढ आणि थकबाकीही मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणेच 1 जानेवारी 2025 पासून 2 टक्क्यांनी वाढलेला महागाई भत्ता लागू केला जाणार आहे. यासोबतच मागील महिन्यांची थकबाकीही दिली जाईल. त्यामुळे एकूण DA 55% होणार आहे.